तुज मागतो मी आता....
आता खरच कंटाळा आलाय,
त्या उशिरा उठण्याचा
घरातल्या कपड्यांचा
दुपारच्या झोपेचा
उबणाऱ्या सोफ्याचा
नवीन रेसिपीज चा
रोजच्या व्हीडिओ कॉल चा
फबी च्या पोस्ट चा
व्हॉटस् ऍप वरच्या चर्चांचा
नवीन नवीन टास्क चा
तेच तेच चेहरे बघायचा
उशिरा पर्यंत जागण्याचा
सतत चार्जिंग ला लावलेल्या मोबाईल चा
नेटफ्लिक्स आणि प्राईम चा
रिपीट एपिसोड चा
दुपारी झोप झाली तर रात्री झोप न येण्याचा
म्हणून
देवा आता ऐक हाक
करू देत नवीन सुरवात
बस झालं आता हे पर्व
कर रे अधिसारखं
जाऊ दे मला माणसांच्या गर्दीत
वाहनांच्या जॅम मध्ये
वाजू देत ते कर्कश्य हॉर्न
आणि
चालू होऊ देत ते सिग्नल
पेपरवाल्यांची पहाट
दुधवाल्यांची घाई
मॉर्निंग वॉक
देवळातल्या घंटा
कामाला जायची लगबग
बसेस चा आवाज आणि धूर
विमानांची येजा
रुळांचा खडखडाट
रिक्षांच मन चाहे गीत
शाळांचे वर्ग
यंत्रांचा आवाज, उद्योग व्यवसाय
फिरू देत अर्थव्यवस्थेची चाक
हॉटेल मधली गजबज
वडापाव आणि कटिंग चहा
पार्किंग साठीची शोधाशोध
नाटक, सिनेमाचे खेळ
गुऱ्हाळच्या घुंगराचा आवाज
चहाच्या कपातल वादळ
बागेतल्या गप्पा
देवळांबाहेरच्या फुलांचा वास
मंगल कार्य
गाण्याच्या मेहेफिली
जिम मधला झुंबा
चाहूल त्या ढोल ताशा च्या प्रॅक्टिस ची
सलून पार्लर मधला फवारा
एकापाठोपाठ सिरिअल
हापूस चा घमघमाट
मॉल मधल विंडो शॉपिंग
पानांचे ठेले
उशिरा पर्यंत च्या बुर्जी च्या गाड्या
गारेगार मस्तानी आणि कुल्फी
आणि मिळू दे ती काम करून थकल्याने लागलेली सुखाची ब्रम्हानंदी टाळी.
सगळं छान झाल्याने पडणार गोड स्वप्न
आता मिळू दे विश्रांती या संकटाशी लढणाऱ्या दृश्य आणि अदृश्य सैनिकांना.
धाव घे तूच आता,
करून नाश या अरिष्टाचा...
हात जोडतो...तुज मागतो मी आता
आता खरच कंटाळा आलाय,
त्या उशिरा उठण्याचा
घरातल्या कपड्यांचा
दुपारच्या झोपेचा
उबणाऱ्या सोफ्याचा
नवीन रेसिपीज चा
रोजच्या व्हीडिओ कॉल चा
फबी च्या पोस्ट चा
व्हॉटस् ऍप वरच्या चर्चांचा
नवीन नवीन टास्क चा
तेच तेच चेहरे बघायचा
उशिरा पर्यंत जागण्याचा
सतत चार्जिंग ला लावलेल्या मोबाईल चा
नेटफ्लिक्स आणि प्राईम चा
रिपीट एपिसोड चा
दुपारी झोप झाली तर रात्री झोप न येण्याचा
म्हणून
देवा आता ऐक हाक
करू देत नवीन सुरवात
बस झालं आता हे पर्व
कर रे अधिसारखं
जाऊ दे मला माणसांच्या गर्दीत
वाहनांच्या जॅम मध्ये
वाजू देत ते कर्कश्य हॉर्न
आणि
चालू होऊ देत ते सिग्नल
पेपरवाल्यांची पहाट
दुधवाल्यांची घाई
मॉर्निंग वॉक
देवळातल्या घंटा
कामाला जायची लगबग
बसेस चा आवाज आणि धूर
विमानांची येजा
रुळांचा खडखडाट
रिक्षांच मन चाहे गीत
शाळांचे वर्ग
यंत्रांचा आवाज, उद्योग व्यवसाय
फिरू देत अर्थव्यवस्थेची चाक
हॉटेल मधली गजबज
वडापाव आणि कटिंग चहा
पार्किंग साठीची शोधाशोध
नाटक, सिनेमाचे खेळ
गुऱ्हाळच्या घुंगराचा आवाज
चहाच्या कपातल वादळ
बागेतल्या गप्पा
देवळांबाहेरच्या फुलांचा वास
मंगल कार्य
गाण्याच्या मेहेफिली
जिम मधला झुंबा
चाहूल त्या ढोल ताशा च्या प्रॅक्टिस ची
सलून पार्लर मधला फवारा
एकापाठोपाठ सिरिअल
हापूस चा घमघमाट
मॉल मधल विंडो शॉपिंग
पानांचे ठेले
उशिरा पर्यंत च्या बुर्जी च्या गाड्या
गारेगार मस्तानी आणि कुल्फी
आणि मिळू दे ती काम करून थकल्याने लागलेली सुखाची ब्रम्हानंदी टाळी.
सगळं छान झाल्याने पडणार गोड स्वप्न
आता मिळू दे विश्रांती या संकटाशी लढणाऱ्या दृश्य आणि अदृश्य सैनिकांना.
धाव घे तूच आता,
करून नाश या अरिष्टाचा...
हात जोडतो...तुज मागतो मी आता